Sourav Ganguly चा १ लाख ६० हजारांचा फोन घरातूनच गेला चोरीला, माजी क्रिकेटरची पोलिसात तक्रार

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) मोबाईल फोन त्याच्या बेहाला येथील घरातून चोरीला गेला आहे. सौरवने कोलकात्याच्या ठाकूरपुकुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खूप शोधाशोध करूनही फोन सापडला नाही, असे सौरवने पोलिस स्टेशन प्रभारींना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मला फोन हरवण्याची काळजी वाटते कारण त्यात महत्वाची वैयक्तिक माहिती आहे.

पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली
फोनमध्ये वैयक्तिक माहिती असल्याचे सौरवने पत्रात म्हटले आहे. ही वैयक्तिक माहिती उघड होऊ नये यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी विनंतीही त्याने केली आहे. असे सांगण्यात येत आहे की सौरव गांगुली शहराबाहेर होता. शनिवारी घरी परतल्यानंतर त्याने आपला फोन घरातच कुठेतरी ठेवला, तेव्हापासून त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

सौरव गांगुलीने पोलीस स्टेशन प्रभारींना पत्र लिहिले
सौरवच्या (Sourav Ganguly) घरात सध्या पेंटिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे कामगारांची ये-जा सुरूच असते. खूप शोधाशोध करूनही फोन सापडला नाही, असे सौरवने पोलिस स्टेशन प्रभारींना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मला फोन हरवल्याची काळजी वाटते कारण त्यात महत्वाची वैयक्तिक माहिती आहे. हा फोन अनेक बँक खात्यांशीही जोडलेला आहे. अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे फोन नंबरही सेव्ह केले आहेत. सौरवच्या या फोनची किंमत १ लाख ६० हजार रुपये होती.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी