सामूहिक लागवडीतून सिताफळ प्रक्रिया उद्योग उभारा; जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

 यवतमाळ   : शेतमालावरील प्रक्रिया उद्योगातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याने शेतकऱ्यांनी सामुहिक सिताफळ लागवडीतून सिताफळ प्रक्रिया उद्योग उभारावा, तसेच उद्योग उभारणीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करून पोकरा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

कोळंबी ता.यवतमाळ येथे नानाजी देशमुख कृषि संजविणी प्रकल्पा अंतर्गत सिताफळ प्रकीया प्रात्याक्षीक व शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी येडगे बोलत होते. कार्यक्रमाला तहसीलदार कुणाल झाल्टे, गटविकास अधिकारी श्री मानकर, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र फाळके, जि.प.सदस्य रेणूका शिंदे, प्रकल्प विशेषज्ञ पोकरा रमेश पिंपरखेडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.सुरेश नेमाडे, जैव तंत्रज्ञान महाविदयालयाच्या सहायक प्राध्यापक अंजली गहिरवार ह उपस्थित होते.

यावेळी अंजली गहिरवार व डॉ.सुरेश नेमाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सिताफळ फळपिकाबदल माहिती यांनी दिली तसेच सिताफळ पल्प तयार करण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. सदर कार्यक्रम अॅड. प्रविण डेहनकर यांचे शेतावर घेण्यात आला. याप्रसंगी कृषी विभागातील सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.