‘या’ कारणामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित होण्याची शक्यता 

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजीचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आरोग्यासंदर्भातील समस्यांमुळे राज यांचा हा बहुचर्चित दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. मनसेनं यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तर राज यांच्या या दौऱ्याचं भवितव्य त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यावर अवलंबून असल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने दिलीय.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन आता राजकारण चांगलंच तापले आहे.  राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तरप्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी जोरदार विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येत पाय ठेवावा अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे.