Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद भाजपला चिंतन करायला लावणार ? 

तुळजापूर – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या तुळजापूर जाहीर सभेला मिळालेला मतदारांचा प्रतिसाद हा महायुतीला चिंतन करायला लावणार आहे. तुळजापूर येथील जाहीर सभेचा प्रचार म्हणावा तसा झाला होता त्यातच वेळ राञीची होती त्या मुळे सभा ऐकण्यासाठी मतदार येईल का खुर्चा भरुन जाईल का असे राजकिय जाणकारांना वाटत होते याला कारण ही तसेच होते महायुतीच्या जाहीर सभेत प्रमुख नेत्यांचे भाषणे चालु असताना मोठा प्रमाणात रिकाम्या होत असलेल्या खुर्चाचे दृश्य पार्श्वभूमीवर ही सभा फेल होते कि काय वाटत असतानाच सभेला प्रचंड गर्दी पाहुन उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रथम जाहीर सभा घैतली व नंतर श्री तुळजाभवानी दर्शनाला प्राधान्य दिले.

विशेष म्हणजे तुळजापूर तालुक्यात शिवसेनेची ताकद नगण्य आमदार भाजप चा अशी राजकिय परिस्थिती असताना ही’  मतदारांनी थांबुन ठाकरे व सुषमा अंधारे यांचे भाषण ऐकले. या व्यासपीठाचा पुरेपुर लाभ भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर  आरोप करुन घेतला.

ठाकरेंनी महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेची शपथ घेत भाजप वर आरोप केले तर सुषमा अंधारेनी महायुतीच्या सर्व नेऊन नेत्यांनी शिवसेनेवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले.  महागाई, आरक्षण, खोटी आश्वासने यावरुन सरकारची पोलखोल केली. नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यावर टिका केली. एकंदरीत नेतृत्व नसताना खर्च न करता घेतलेल्या सभेस मिळालेला प्रचंड प्रतिसाद महायुतीसाठी धोक्याची घंटा वाजवणारा ठरणारा असल्याची चर्चा चर्चिली जात आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन – Pankaja Munde

तुम्ही ज्या जागा जिंकू शकणार नाहीत, त्याच मविआ तुम्हाला देत आहे- Nitesh Rane

खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका; Chandrashekhar Bawankule यांचा पलटवार