ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, ख्रिस्ती समाजाला राजकीय सत्तेत स्थान देण्याची केली मागणी

Christian society : वर्षानुवर्षे ख्रिस्ती समाज (Christian society) राजकीय द्रुष्टा उपेक्षित राहीला असून आता अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी ख्रिस्ती समाजाला लोकसभा आनी विधानसभेत महत्त्वाचा वाटा द्यावा, अशी आग्रही मागणी रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत केदारी (Prashant Kedari) यांनी वंचित आघाडीचे अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना केली आहे. ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुंबई येथे राजगृहावर आंबेडकर यांची भेट घेतली.

ख्रिस्ती समाजाची राजकीय व सामाजिक भूमिका घेण्यासाठी वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर निर्णायक व सकारात्मक चर्चा राजगृह दादर मुंबई येथे झाली. रिजनल ख्रिश्चन सोसायटीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली राजकीय भूमिका घ्यावयाच्या संदर्भात तसेच राजकीय प्रतिनिधित्व यासंदर्भात ,समाजाच्या मूलभूत प्रश्नांच्या संदर्भात व होत असलेल्या अन्यायाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ख्रिस्ती समाजाचे नेते प्रशांत (लुकस) केदारी यांनी आंबेडकर यांच्याशी बोलताना सद्य समाजाची परिस्थितीत येणाऱ्या लोकसभा,विधानसभा,स्थानिक स्वराज्य इ.प्रतिनिधित्व मिळावे.ख्रिस्ती समाजाच्या अनेक अडचणी आहेत, ख्रिस्ती समाजांच्या चर्चेस,धर्मगुरू-पास्टर यांचे हल्ल्यापासून संरक्षण, अनुसूचित जातीतून धर्मातरीत खिश्चनाना आरक्षण इ विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली. प्रमोद पारधे यांनी वडगावशेरी विधानसभेची विस्तृत माहित बाळासाहेब याना दिली व कसे विधानसभेत यश प्राप्त करू शकतो याचे विश्लेषण केले. बैठक वंचित बहुजन आघाडीचे किरण गायकवाड यांच्या द्वारे झाली. सोन्याबापू वाघमारे यांनी प्रशांत केदारी हे भक्कम नेतृत्व आहे त्यांना सर्वांचे पाठबळ आहे. समविचा-यांची साथ व संधी मिळाल्यास ते विधानसभेत समाजाच्या वतीने नेत्रृत्व करण्यास पात्र आहेत. अँड.अंतोन कदम यांनी ४०-४१लाख महाराष्ट्रात जनसंख्याचा विखूरलेला व प्रादेशिक भाषेत विभागलेला समाजाचे नेत्रृत्व नाही अशी खंत व्यक्त केली. आम्ही इतिहास करू व प्समाजाला संधी द्या असे सांगितले. पीटर डिसुझा यांनी समाजाच्या स्थिती बद्दल भावना व्यक्त केल्या.

प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जाणून घेवून खिस्ती समाजाचे योगदान आहे पण केवळ चर्च कंपाऊंड मधून तुम्हाला नेत्रृत्व कसे मिळेल. तुम्हाला मुख्य प्रवाहात येवून जनजाग्रृती करावी लागेल. तुमचे सगळे सेवास्त्रोत जमेस धरून त्यांची मोठ बाधावी लागेल. तळागाळातील लोकांना समता व मानवतेच्या विचारधारेला जोडावे लागेल. तुम्ही समाजकरणात येत आहात याचा आनंद वाटतो. भविष्यात आपण एकत्रितपणे काम करु असे सांगितले.

जॉर्ज रॉड्रिग्स यांनी बाळासाहेबांचे आभार मानले. याबरोबरच शिष्टमंडळात मार्कस पंडित ,रवींद्र कांबळे,प्रतिमा केदारी ,मेरी पारगे ,सलोमी तोरणे, तेरेसा केदारी, ऍंथोनी कर्डक,जॉन रूपवते,रतन ब्राह्मणे,जॉन केडर, सुभाष केदारी, छगन धीवर यासह राज्यभरातील ख्रिस्ती समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत – Nana Patole

Atif Aslam | “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच”, मनसेचं बॉलिवूडकरांना थेट आव्हान