पीले पीले ओह मेरे जानी : कुणाल राऊतांची पक्ष शिबीराच्या नावाखाली धांगडधिंगा पार्टी ?

मुंबई – कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Congress leader MP Rahul Gandhi) यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झालेला असताना आता राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचे पुत्र व युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांच्यावर भाजपने (BJP) गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांच्या माध्यमातून शिबिराच्या नावाखाली धांगडधिंगा पार्टी आयोजित करण्यात आली होती, असा दावा भाजपने केला आहे. तसेच या पार्टीचा व्हिडीओही ट्विट (Video Tweet) करण्यात आला आहे. (Congress Latest Marathi News)

कुणाल राऊत यांची नुकतीच अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला (Shahzad Poonawala) यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या शिबीरातील हा व्हिडीओ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या व्हिडीओ 24 सेकंदाचा असून त्यामध्ये ‘पीले पीले ओह मेरे जानी’ या हिंदी चित्रपट गीतावर धांगडधिंगा सुरू असल्याचे दिसते.