‘अखिलेश यादवची अन् माझी जुनी मैत्री’, रजनीकांत यांना म्हणायचयं तरी काय?

Rajinikanth Meets Akhilesh Yadav: सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून येथे त्यांनी राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. काल त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. यानंतर रजनीकांत यांनी माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर रजनीकांत यांनी ट्वीट करत वक्तव्य केले आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “मी नऊ वर्षांपूर्वी अखिलेशला भेटलो होतो. त्यानंतर बऱ्याच वर्षात त्याच्याशी भेट आणि बोलणे झाले नाही. आम्ही फोनवर एकमेकांच्या संपर्कात होतो. मुंबईतील एका कार्यक्रमांमध्ये आम्ही भेटलो होतो. तिच आमची शेवटची भेट होती. मी एकदा उत्तर प्रदेशमध्ये शुटींगच्या निमित्तानं आलो होतो तेव्हाही त्याला भेटणे झाले नाही. आता मी त्याला भेटणार आहे. आमची जुनी मैत्री आहे.” असे रजनीकांत यांनी म्हटले आहे.