Rajnath Singh | आपले सैनिक कुटुंबापासून दूर राहतात त्यामुळे आपण शांततेने होळीसारखे सण साजरे करतो

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी काल प्रतिकूल हवामानात देशाचे रक्षण करण्यासाठी सशस्त्र दलांच्या शौर्याचे, दृढनिश्चयाचे आणि बलिदानाचे कौतुक केलं. त्यांच्यासोबत होळी साजरी केल्यानंतर लेहमधील सैनिकांना संबोधित करताना ते बोलत होते. उंचावर तैनात असलेल्या सैनिकांची सकारात्मक वचनबद्धता उणे तापमानापेक्षा जास्त मजबूत असून देशातील प्रत्येक नागरिकाला सशस्त्र दलांचा अभिमान आहे. आपले सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहतात त्यामुळे होळी आणि इतर सण आपण आपल्या कुटुंबियांसोबत शांततेने साजरे करतो.

देश, आपल्या सैनिकांचे सदैव ऋणी राहील आणि त्यांचे धैर्य आणि बलिदान भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं सांगताना कारगिलच्या हिमशिखरांवर, राजस्थानच्या रणरणत्या पठारी प्रदेशात आणि खोल समुद्रात असलेल्या पाणबुड्यांमध्ये सैनिकांसोबत उत्सव साजरा करणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. राजनाथसिंह सैनिकांसोबत होळी साजरी करण्यासाठी सियाचीनला जाणार होते, परंतु प्रतिकूल हवामानामुळे ते पोहोचू शकले नाहीत. त्यांनी सियाचीन इथं तैनात सैनिकांशी संवाद साधला आणि त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. सियाचीन येथील सैनिकांशी संवाद साधण्यासाठी लवकरच लडाखला पुन्हा भेट देण्याचे आश्वासन राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मोहोळांचा घरोघरी जाऊन प्रचार

विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान – मिटकरी

Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार, एक जागा ‘रासप’ला दिली जाणार