विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान – मिटकरी 

Amol Mitkari: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election 2024) महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीतील भाजपा पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा निर्माण झाल्याने इतर पक्षांनी आपली उमेदवारी घोषित केली नसल्याचे चित्र आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात (LokSabha Election 2024) महायुतीत कलगीतुरा सुरु असून माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत आहे.

शिवतारे हे सातत्याने दोन्ही राष्ट्रवादीच्या गटावर टीका करत असल्याने आमदार अमोल मिटकरी चांगलेच भडकले आहेत. ते म्हणाले,  विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान आहे. याला मातीत गाडल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. शिवतारे यांची फडफड विझणाऱ्या दिव्यासारखी आहे. केवळ बार्गेनिंग पॉवर वाढवून पाच-पन्नास लाख रुपये गोळा करण्याचा सध्या ते प्रयत्न करत आहेत, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

शिवतारे यांच्या मागे इतर व्यक्तींचा मेंदू आहे. त्याचा तपास आम्हाला करावा लागेल. थोड्या पैशांसाठी बार्गेनिंग पॉवर वापरायची आणि कोणत्यातरी पक्षाकडून ५-२५ लाख घ्यायचे. यासाठी त्यांची तडफड सुरु आहे, असंही अमोल मिटकरी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मेधा कुलकर्णींनी कसली कंबर

Rohit Pawar | शासकीय आश्रम शाळेत दूध घोटाळा; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Sharad Pawar | केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार