रजनीश सेठ यांनी स्विकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष पदाचा कार्यभार

Rajnish Sheth:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कोकण भवन, नवी मुंबई येथे आज स्विकारला. यावेळी त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी सेठ यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

यावेळी आयोगाचे सदस्य डॉ.दिलीप पांढरपट्टे, डॉ.अभय वाघ, डॉ.सतिश देशपांडे, आयोगाच्या सचिव डॉ.सुवर्णा खरात, सहसचिव सुभाष उमराणीकर, सहसचिव सुनिल अवताडे, उपसचिव मारुती जाधव, देवेंद्र तावडे, चंद्रशेखर पवार, संजय देशमुख, विपुल पवार, संशोधन अधिकारी राजश्री भिसे आदि उपस्थित होते.

आयोगाच्या सचिव डॉ.सुवर्णा खरात यांनी सेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रचना व कार्य पध्दती विषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. ही माहिती समजून घेतल्यानंतर सेठ यांनी आयोगाचा कारभार हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत अतिशय शिस्तबध्दतेने, पारदर्शकपणे करु, असे आवाहन आयोगाच्या सन्माननीय सदस्यांना व इतर अधिकाऱ्यांना केले.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’