आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन 

Supriya sule – शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची तिच परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. आज या मोर्चाचा तिसरा दिवस असून या मोर्चाने बारामती मतदार संघातील दौड येथून मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील सहभाग नोंदवला. यावेळी शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिन सरकारने केले आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता आक्रोश मोर्चा सुरू आहे. मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे. हा मोर्चा आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर मी अनेक वेळा केंद्रीय मंत्री यांना ट्विटर द्वारे यासंदर्भातील जाणीव करून दिली होती. मात्र तरी देखील या सरकारने कुठलेही ठोस निर्णय न घेतल्यामुळे आज कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

सुळे म्हणाल्या की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात वारंवार केंद्रीय मंत्री यांना सांगितले होते संसदेमध्ये या संदर्भात प्रश्न देखील उपस्थित केला होता मात्र त्यावेळी माझ्यावर भ्रष्ट जुमले पार्टीच्या वतीने टीका करण्यात येत होती मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला एक रुपया भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून कांद्याचे उभे पीक जाळण्यात येत आहे देशातील आणि राज्यातील सरकार हे शेतकरी विरोधातील आहे. सरकारच्या शेतकरी धोरणांमध्ये गोंधळ. आमचे सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी करणार असे देखील सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

दिल्लीचे भाजपचं हे सरकार नसून ती दडपशाही आहे. सरकारला लोकशाही नको आहे म्हणून निवडणुका घेतल्या जात नाहीयेत. दीड वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात आलेल्या नाही आहे. असे सुळे म्हणाल्या.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सर्वसामान्य मायबाप जनतेत फिरलं, तर तुम्हाला कळेलचं की, आज जनता आणि शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे. आज शेतकऱ्यांच्या पिकांना कवडीमोल भाव मिळत आहे. कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास सरकारने काढून घेतला. भापज सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांनी शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे.असेही सुळे म्हणाल्या.

पुढे म्हणाल्या की, वैयक्तिक कुणाचा विरोध नसतो. हा विरोध चुकीच्या धोरणांचा आहे. वैयक्तिक कोणाशी नाही. आमची लढाई भाजपच्या शेतकरी विरोधी नीतीच्या विरोधात आहे. भाजप हा शेतकऱ्यांच्या आणि महिल्यांच्या विरोधी आहे. सर्वसामान्य गोरगरीब वंचित आणि कष्टकरी यांच्या विरोधात हे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे.

जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात, तेव्हाच राज्यातील क्राईम का वाढतो. ? यापूर्वी ५ वर्षे जे फडणवीस होते ते आता राहिले नाहीत. भाजप फडणवीसांवर अन्याय करत आहे. दिल्लीतील नेत्यांकडून फडणवीसांचा अपमान केला जातो. एखादा नेता कष्ट करत असेल तर त्याचा मान सन्मान करायला नको का? एका मराठी माणसाचा अपमान दिल्लीचा दरबार करतो याची मला अस्वस्थता होते. तसेच भाजप हा महिलांविरोधी पक्ष आहे असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डीत ३ जानेवारीला कार्यकर्ता शिबिर; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

निधीतील घसरणीवर मात करण्यासाठी काँग्रेसने स्वीकारला क्राऊड फंडिंगचा मार्ग, जाणून घ्या कसा मिळतोय प्रतिसाद

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वातंत्र्यापूर्वीचे दिवस परत आणायचे आहेत’

मोदींची हुकूमशाही रोखायला एकत्र या! प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र!