आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) हे संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी देवेंद्र भुयार आहे. गुरूवारी देवेंद्र भुयार यांच्यावर राजू शेट्टी यांनी टीकाही केली. ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला असे राजू शेट्टी म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत आमदार भुयार यांनी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार म्हणून निवडून आले. अरे दरम्यान आमदार भुयार यांनी मंत्रिपदासाठी पक्ष नेते खासदार राजू शेट्टी यांच्याकडे आग्रह धरला. त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक दिवसांपासून पक्षाच्या पहिल्या फळीतील नेते व देवेंद्र भुयार यांच्यामध्ये खटके उडत होते.

दरम्यान, आमदार देवेंद्र भुयार यांनी इतर पक्ष्यांची जवळीक साधत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला सुद्धा लावणे बंद केले होते. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन विदर्भ अध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी आमदार भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करा असा प्रस्ताव राजू शेट्टी यांना दिला होता यावरूनच ही कारवाई करण्यात आली आहे.