जयंत पाटील BJP च्या वाटेवर? पुण्यात अमित शाह-जयंत पाटलांची भेट?

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नुकताच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या या भूमिकेच्या विरोधात आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत. मात्र आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी घेतलेल्या एका भेटीमुळे त्यांच्या भूमिकेसंदर्भात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

झी २४ तास या वाहिनीने हे वृत्त दिले आहे. सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) हे शनिवारच पुण्यात आले आहेत. पुण्यातील एका हॉटेलमध्ये अमित शाह व जयंत पाटील यांची रविवारी सकाळी भेट झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनीच ही भेट घडवून आणण्यासाठी मध्यस्थी केली आहे. जयंत यांच्याबरोबर त्यांचे भाचे आमदार प्राजक्त तनपुरे व आमदार सुमन पाटील याही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे.