नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; मातब्बर नेत्याने केला शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

वांद्रे कलानगर येथील मुस्लिम महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधली राखी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न

Mangesh Kadam : नांदेडचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि मागासवर्गीय विभाग विकास काँग्रेस कमिटीचे सदस्य मंगेश कदम (Mangesh Kadam, City President of Nanded Congress Party and Member of Backward Classes Development Congress Committee) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. नांदेडचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर (Shiv Sena MLA Balaji Kalyankar) यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश पार पडला. कदम यांचा पक्षप्रवेश हा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना धक्का समजला जात आहे.

त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि नांदेडमधील माजी स्थायी समिती सदस्य ज्योती मनीष कदम, ऍड. धम्मपाल कदम, विकास गायकवाड, प्रवीण वाघमारे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

मंगेश कदम हे नांदेड जिल्हा परिषदेचे काँग्रेस पक्षाचे सहा वेळा नगरसेवक होते. तर त्यांच्या पत्नी ह्या माजी समिती सदस्य होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित झाल्यामुळे आणि काँग्रेस पक्षाने आपला वापर करून नंतर आपल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे मत यावेळी कदम यांनी व्यक्त केले.

वांद्रे कलानगर येथील मुस्लिम महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधली राखी

वांद्रे पूर्व येथील भारत नगर, कला नगर, बिकेसी येथील मुस्लिम बांधव आणि भगिनींनी आज स्थानिक नेते सलिम जफर शेख यांच्या पुढाकाराने शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

यावेळी काही मुस्लिम महिलांनी लोकांसाठी काम करणारे ‘लोकनाथ’ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनगटावर राखी बांधली. सर्व धर्मांचा सन्मान करणारा पक्ष म्हणजे शिवसेना असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानंतर बोलताना व्यक्त केले.

यावेळी सद्दाम अब्दुल सत्तार शेख, मुदशीर सिद्धीकी, शमद शेख, सलाना शेख, रेहाना काशु, आफरिन शेख, अब्दुल कादर यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्याः

हे तर एखाद्या शेंबड्या पोरालाही पटणार नाही; जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
देशात शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट, चुकीच्या लोकांकडे देशाचे नेतृत्व गेलेले आहे- शरद पवार
देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची: नाना पटोले
राज्यातील येड्याच्या सरकारने वीज महाग केली आहे, शेतीला आठ तासही विज मिळत नाही – Nana Patole