Ambadas Danve: महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024) वारे वाहू लागले आहे. अशातच शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं तर मी कोरड्या विहिरीतही उडी मारायला तयार आहे, मग लोकसभा निवडणूक लढवणे मोठी गोष्ट नाही, असे वक्तव्य देत अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी दाखवली आहे.
उद्धव ठाकरे म्हणतील ते मी करायला तयार आहे. ठाकरेंनी कोरड्या विहिरीत उडी मारायला सांगितली तर त्याची देखील माझी तयारी आहे. त्यामुळे उमेदवारीचा तर प्रश्नच येत नाही. त्यांनी लोकसभा लढण्यास सांगितलं तर मी निवडणूक नक्की लढवेन, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
मोदी सरकार भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही, मुजोर बजरंग पुनियाचा तीव्र निषेध : अतुल भातखळकर
दु:खद! प्रसिद्ध कॉमेडियनने घेतला जगाचा निरोप, दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे गेला जीव
हार्दिक पांड्याच्या संघात पुनरागमनाचा सस्पेन्स संपला! ‘या’ मालिकेतून कमबॅक करणार