…तर मुंबईत चालणं, बोलंण आणि फिरण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, राणेंचा उद्धव ठाकरे गटाला इशारा

Mumbai – शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) वादात आता भाजप ज्येष्ठ नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची एन्ट्री झाली आहे. मुंबईतील प्रभादेवी इथे झालेल्या राड्यानंतर (Prabhadevi Rada) नारायण राणे यांनी आज आमदार सदा सरवणकर यांच्या घरी जाऊन भेट घेतली. स्वत: सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे नारायण राणेंच्या स्वागतासाठी घराखाली उभे होते.

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेकडे तक्रार करण्यापलीकडे फार काही उरलं नाही. ‘मातोश्री’च्या दुकानामध्ये बसून तक्रारीचं मार्केटिंग सुरू असल्याची खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे.

पुढे बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, सदा सरवणकर हे आमचे मित्र आहेत. सध्या आमची युती आहे. मात्र युतीपेक्षाही ते आमचे मित्र आहेत, म्हणून त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. असे हल्ले करू नका नाहीतर मुंबई आणि महाराष्ट्रात चालणं, बोलणं, फिरणं अवघ होईल त्यासाठी परवानगीची गरज लागेल, असा इशाराही नारायण राणे यांनी यावेळी शिवसेनेला दिला आहे.