प्लास्टिक पाणी बॉटल खरेदी करताना नंबर जरुर तपासा, ‘या’ क्रमांकाच्या बाटल्या वापरणे आरोग्यासाठी घातक!

आजकाल तुम्हाला सर्व काही प्लास्टिकमध्ये सापडेल. विशेषत: तुम्ही पिण्याच्या पाण्यासाठी बाटली विकत घ्यायला गेलात, तर तुम्हाला बहुतांश पर्याय प्लास्टिकमध्येच मिळतील. ते आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे याचा विचार न करता लोकही बिनधास्त त्यांची खरेदी करत आहेत. पण कोणते प्लास्टिक आरोग्यासाठी घातक आहे आणि किती योग्य आहे हे कसे समजणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. परंतु आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला अशाच काही कोडबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्या नंबरची प्लास्टिकची बाटली खरेदी करावी आणि कोणती करू नये? हे जाणून घेऊ शकाल.

या संख्यांचा अर्थ जाणून घ्या
जर तुमच्या प्लास्टिकच्या बाटलीवर #3 किंवा #7 क्रमांक लिहिलेला असेल तर याचा अर्थ BPA सारखे हानिकारक घटक या प्लास्टिकमध्ये मिसळले आहेत. तुम्ही लक्षपूर्वक पाहाल तेव्हा तुम्हाला बाटलीच्या खालील बाजूस त्रिकोणी आकारात लिहिलेली संख्या दिसेल. बाटली खरेदी करताना तुम्हाला हा नंबर पाहावा आणि जाणून घ्यावा लागेल. तुमच्या प्लॅस्टिकच्या बाटलीच्या मागील बाजूस क्रमांक #1 लिहिलेला असेल, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही ही बाटली एकदाच वापरू शकता.

दुसरीकडे, जर तुम्हाला पुन्हा वापरता येणारी बाटली खरेदी करायची असेल, तर तुम्ही बाटलीच्या मागील बाजूस #2, #4, #5 आहे की नाही हे पाहावे. वास्तविक, तुम्ही या क्रमांकासह प्लास्टिकची बाटली पुन्हा वापरू शकता. हे सुरक्षित मानले जातात. दुसरीकडे, जर प्लास्टिकच्या बाटलीवर क्रमांक #3, #6, #7 लिहिलेले असतील, तर तुम्ही अशा बाटलीचा वापर टाळावा.

PET किंवा PETE असे लिहिले असेल तर त्याचा अर्थ काय?
हा कोड घरात वापरल्या जाणार्‍या बहुतेक प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये आढळेल. वास्तविक, हे सामान्य दर्जाचे प्लास्टिक आहे, जे बहुतेक बाटल्या आणि प्लास्टिकच्या बॉक्सवर वापरले जाते. मग ते थंड पेय असो की पाण्याची बाटली. अगदी प्लास्टिकचे बॉक्स आणि बाटल्या ज्यामध्ये किराणा सामान तुमच्या घरी येतात, त्यांच्यामध्येही हा कोड दिसतो. तथापि, हा कोड असलेल्या बाटलीचा दीर्घकाळ वापर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो.