‘राऊत साहेब तुम्ही उद्धव ठाकरेंचे ब्लू आईड बॉय आहात की शरद पवारांचे?’

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut Press) यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील आणि राज्यातील भाजपवर हल्लाबोल (Raut Criticized BJP) केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरोधातील सर्व प्रकरणे खोटी असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान, राऊत यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट होतील अशी आशा तमाम मराठी जनतेला होती मात्र या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप पाहिल्यानंतर जनतेचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला. यानंतर आता भाजप नेते राऊत यांची खिल्ली उडवत टीका करू लागले आहेत. दरम्यान, राऊत यांनी काल भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावरती अनेक गंभीर आरोप केले. कंबोज हा माणूसच फडणवीसांचा मर्जीतील ‘फ्रँटमॅन’ असून हा व्यक्तीच फडणवीसांना बुडवणार असंही राऊत म्हणाले. यानंतर याच आरोपांच खंडण करण्यासाठी मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये त्यांनी राऊतांवरती टीका केली आहे.

मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ‘प्यून’ जरी झालो तरी मला त्याचा अभिमान आहे. पण राऊत साहेब तुम्ही मुख्यमंत्र्यांचे ब्लू आईड बॉय आहात की पवार साहेबांचे ? मला वाटतं हा राऊतांच्या फ्लॉप शो होता असा टोलाही कंबोज यांनी लगावला. तसंच राऊत म्हणाले माझ्या पत्रकार परिषदे नंतर घाम फुटेल पण त्यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांना घाम फुटला. पण मिया प्रमाणे बारामतीची हरबल खाऊन पत्रकार परिषद घेत आहात का 10 लाख चौरस मीटरची जागा कुठे असते का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.