‘उद्धव ठाकरे साहेब अन्वय नाईक कडून घेतलेल्या 19 घरांचे काय झाले ..?’

मुंबई – उद्धव ठाकरे साहेब “अन्वय नाईक” कडून घेतलेल्या 19 घरांचे “काय झाले..?” असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवार यांनी 21 मार्च 2014 ला अन्वय नाईक परिवाराकडून अलिबाग जवळच्या कोलेई गावातल्या 30 जमिनी विकत घेतल्या. आम्ही आज कोर्लई गावात जाऊन या संबंधित अधिक माहिती घेतली. ग्रामपंचायत, तलाठी/तहसीलदारच्या रेकॉर्डवरून काही प्रश्न उपस्थित होत आहेत.असं सोमय्या यांनी म्हटले आहे.

सोमय्या म्हणाले, 12 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे परिवार, रविंद्र वायकर परिवार आणि अन्वय नाईक परिवाराच्या आर्थिक जमिनीचे व्यवहार या संबंधीची माहिती, खुलासा आम्ही जनतेला दिला. आश्चर्याची बाब अशी आहे की, अन्वय नाईक यांच्या या 30 जमिनी ठाकरे, वायकर परिवाराने विकत घेतल्या. हा व्यवहार 21 मार्च 2014 रोजी पूर्ण झाला, त्याचे अॅग्रिमेंट ट्रान्सफर व सगळे पेपरवर्क पूर्ण झाले.

परंतू या जमिनींवर 19 घरं ज्यांचे बांधकाम 550 स्क्वेअर फुट पासून 2500 स्क्वेअर फुट पर्यंतची 19 घर अस्तित्वात होती/आहेत. असे ठाकरे व नाईक परिवारचे डॉक्युमेंट पाहता दिसत आहे. ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड्स पाहिल्यावर लक्षात येते की 2009-2010 पासून ही घरं त्या जमिनीवर अस्तित्वात आहेत. या 19 घरांचे एकुण बांधकाम 23500 स्क्वेअर फूट आहे, याचे ग्रामपंचायत, राज्य सरकारच्या रेडी रेकनर प्रमाणे मूल्य रुपये 5 कोटी 29 लाख होते.

21 मार्च 2014 रोजी अन्वय नाईक परिवाराकडून उद्धव ठाकरे परिवाराने या सर्व जमिनी घरांसह विकत घेतल्या, परंतू 13 नोव्हेंबर 2020 पर्यंत म्हणजेच आम्ही हा खुलासा करे पर्यंत ही घर के अन्वय नाईकच्या नावाने ग्रामपंचायतीत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ही बेनामी प्रॉपर्टी तर नाही ना…? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी ही 5 कोटींची 19 घरं त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवल्याचे दिसत नाही लक्षात येत नाहीत. या संबंधी मुख्यमंत्री स्पष्टता करणार का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड पाहताना 2019-2020, 2020-2021 चे जे प्रोसिडींग चूक, फॉर्म 8 व अन्य जे रोकॉईस आहेत त्यात स्पष्टता नाही, त्यात तारीख, केव्हा बैठका झाल्या याचा अधिकृत तपशीलात गोंधळ दिसत आहे. ग्रामपंचायतीत ही 19 घरं श्रीमती रश्मी ठाकरे यांच्या नावावर करावी असा ठराव 7 जून 2019 च्या तारखेचा असल्याचे भासवले जात आहे. परंतू तो व्यवहार अधिकृत 12 नोव्हेंबर 2020 नंतर झाला असल्याचे ग्रामसेवक व तलाठी यांनी आम्हाला सांगितले.

दुसरा आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो की, के. अन्वय नाईक यांचा मृत्यू 2018 मध्ये झाला परंतू श्री उद्धव ठाकरे परिवाराच्या नावाने ही घरे करण्याचा अर्ज, ठराव, पैसे भरणे, अधिकृत करणे हा सर्व व्यवहार हे 2020 नोव्हेंबर मध्ये किंवा त्या काळामध्ये झाला याची कायदेशीर स्थिती काय?

असा व्यवहार करण्यासाठी अन्वय नाईकच्या मृत्यूनंतरची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का? या संबंधीही स्पष्टता हवी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक परिवाराशी असलेल्या आर्थिक संबंधां विषयी स्पष्टता करावी असा प्रश्न भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे.