Ravindra Jadeja | चेपॉकमध्ये ‘सर जडेजा’ची कमाल, 8 चेंडूत केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले

Ravindra Jadeja | चेपॉकच्या मैदानावर रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीची जादू चाहत्यांनी अनुभवली. जड्डूच्या फिरत्या चेंडूंसमोर केकेआरचे फलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते. जडेजाने सुनील नारायण आणि अंगक्रिश रघुवंशी यांचा डाव एकाच षटकात संपुष्टात आणला. चार षटकांच्या स्पेलमध्ये सर जडेजाने केवळ 18 धावा देत तीन विकेट घेतल्या.

सर जडेजाची जादू चालली
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर तुषार देशपांडेने खाते न उघडता फिल सॉल्टला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, यानंतर रघुवंशी आणि सुनील नरायण यांनी जबाबदारी स्वीकारत संघाची धावसंख्या पन्नासच्या पुढे नेली. नारायण आणि रघुवंशी ही जोडी फोडण्यासाठी कर्णधार रुतुराजने चेंडू रवींद्र जडेजाकडे सोपवला. जडेजा (Ravindra Jadeja) त्याच्या कर्णधाराच्या भरवशावर पूर्णपणे खरा उतरला.

जडेजाने त्याच्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर अंगक्रिश रघुवंशीचा डाव संपवला. रघुवंशी जड्डूचा फिरणारा चेंडू समजू शकला नाही आणि झेलबाद झाला. त्याच षटकात जडेजाने पुन्हा एकदा आपली जादू पसरवत सुनील नारायणचा डाव संपुष्टात आणला. नारायण 20 चेंडूत 27 धावा करून बाद झाला.

व्यंकटेशचीही शिकार केली
पहिल्या षटकात दोन विकेट घेतल्यानंतर जडेजा दुसऱ्या षटकातही केकेआरसाठी अडचणीचा ठरला. षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर जड्डूने व्यंकटेश अय्यरलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. डॅरिल मिशेलकडे सोपा झेल दिल्यानंतर अय्यर जडेजाच्या जाळ्यात अडकला. चार षटकांच्या स्पेलमध्ये, सीएसकेच्या गोलंदाजाने केवळ 18 धावा देत 3 बळी घेतले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला