Ashish Shelar | अमोल किर्तीकर यांना हरवण्यासाठी गजानन किर्तीकर प्रचाराच्या मैदानात म्हणजे विजय निश्चित!

Ashish Shelar | आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना हरवण्यासाठी खासदार गजानन किर्तीकर प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. म्हणजे महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar ) यांनी व्यक्त केला.

दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आज खा. गजानन किर्तीकर यांच्या उपस्थितीत पार पडला. भाजपा आमदार राजहंस सिंह यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या न्यायपत्राचा खरपूस समाचार घेतला.

संविधानावर चर्चा करण्यासाठी या
संविधानावर चर्चा करण्यासाठी जितेंद्र आव्हाड, नाना पटोले आणि काँग्रेसवाल्यांनी यावे आम्ही तयार आहोत. जागा, तारीख, वेळ तुमची असे थेट आव्हान ही यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी केले.

महामानव भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेली घटना बदलणार असा अपप्रचार आज विरोधक करीत आहेत. ते हे का विसरत आहेत की, हेच ते कॉंग्रेसवाले आहेत त्‍यांनी घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले होते. एवढेच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍याप्रती कधी प्रेमही दाखवले नाही. तर कॉंग्रेसने आपल्‍या राजवटीत अनेक वेळा घटना बदलण्‍याचे काम केले त्‍यामुळे आज केवळ खोटे बोलून दिशाभूल करण्‍याचे काम कॉंग्रेस करीत आहे.

ते पुढे म्हणाले की, कॉंग्रेसचा जाहीरनामा म्‍हणजे असाच एक खोटारडेपणाचा कळंस म्‍हणावा असाचा आहे. त्‍यांनी जाहीरनाम्‍याचे नाव न्‍यायपत्र असे ठेवले आहे.

त्‍यांनी या झुठपत्रात संविधानाचे संरक्षण करण्‍याची बाब नमुद केली आहे. मग आणिबाणीमध्‍ये या देशाला कुणी ढकलले, हे आज युवा वर्गाला न्‍याय देण्‍याची बात करीत आहेत, मग जेएनयुमध्‍ये तरुणांची माथी कुणी भडकवली, हे आज शिक्षणाला न्‍याय देण्‍याची घोषणा करीत आहेत मग नवे शैक्षणिक धोरण कुणी रोखले, आज हे भ्रष्‍टाचार कमी करणार असे सांगत आहेत कॉग्रेसच्‍या घोटाळयांची यादीच वाचून दाखवत आमदार अँड आशिष शेलार यांनी खरपूस समाचार घेतला. आदिवासींना न्‍याय देण्‍याचे कॉंग्रेस बोलत आहे मग आदिवासी समाजातील श्रीमती द्रौपदी मुर्मु राष्‍ट्रपती झाल्‍या त्‍यावेळी त्‍यांना कॉंग्रेसने पाठींबा का दिला नाही ?असा थेट सवालही त्यांनी यावेळी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला