Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला

Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol ) हे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. त्यांचा दररोज नियोजनबद्ध प्रचार असून ते समाजातील विविध घटकांची तसेच विविध समाजाच्या गाठीभेटी घेत आहेत. भारताचं भविष्य नरेंद्र मोदींच्या हाती सुरक्षित राहू शकतं, त्यामुळे त्यांना मोठ्या मतांनी निवडून आणा, असे आवाहन ते जनतेला करताना दिसत आहेत. यादरम्यान पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना मुरलीधर मोहोळ यांनी विरोधी उमेदवार महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना खोचक टोला लगावला आहे.

पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना पुण्यातील पाणी प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यासाठी केलेली विकासकामे यावर मुरलीअण्णांनी प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान कोथरुडमधील नागरिकांनी धंगेकराना ४२ हजारांचा निधी जमा करुन दिला. यावर तुम्हाला असा निधी मिळाला नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना मोहोळ म्हणाले, “निधी मिळाला म्हणजे प्रेम मिळतं असं नसतं. तुम्ही जनतेसाठी काय केलं? आणि काय करत आहात? यावर सर्वकाही अवलंकून असतं. पुणेकरांचं मन आम्ही जिंकलेलं आहे. पुणेकर भावनने – मनाने आमच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांना निधी मिळाला, पण मला जनतेचे प्रेम मिळतेय”, असा टोमणा मोहोळ यांनी धंगेकरांना मारला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Har Ghar Modi Parivar Abhiyan | दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’

Shivajirao Adhalrao Patil | ‘जुन्नरमधून शिवाजीदादांना सर्वाधिक मते पडणार’, आमदार अतुल बेनकेंनी व्यक्त केला विश्वास

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !