Rishabh Pant Fined | सीएसकेविरुद्धच्या विजयानंतरही दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला १२ लाखांचा दंड, पण कारण काय?

Rishabh Pant Fined | रिषभ पंत याच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटलने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आयपीएल 2024 चा पहिला विजय नोंदविला. रविवारी (01 एप्रिल) विशाखापट्टनमचे डॉ. वाय. एस. एस. राजसेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईला 20 धावांनी पराभूत केले. पण आता या विजयानंतर पंतला मोठा धक्का बसला आहे. सीएसकेविरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या कर्णधाराने मोठी चूक केली, ज्यासाठी त्याला मोठी शिक्षा मिळाली.

खरं तर, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या कर्णधाराला षटकांची गती कमी राखल्यामुळे दंड ठोठावण्यात आला. स्पर्धेतील दिल्ली कॅपिटलने षटकांची गती कमी राखल्याण्याचे हे पहिले प्रकरण होते, ज्यासाठी दिल्लीचा कर्णधार पंतला 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.

दुसरीकडे पंत (Rishabh Pant Fined) दुसरा कर्णधार आहे, ज्याला आयपीएल 2024 मध्ये हा दंड सहन करावा लागला आहे. यापूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल, त्याचा बळी पडला आहे. गेल्या मंगळवारी (26 मार्च) गुजरातने एम चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामना खेळला. या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुबमन गिल यालाही स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला. गिलला 12 लाख रुपये दंड झाला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका