Mahadev Jankar | जगात जर्मनी अन् भारतात परभणी, पण…, उमेदवारी जाहीर होताचं महादेव जानकरांचं विरोधकांवर टीकास्त्र

Mahadev Jankar | काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या वाटेवर असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी आपली भूमिका बदलली आहे. महादेव जानकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार यांची भेट घेत आपण महायुतीतच राहणार असल्याचे जाहीर केले. यानंतर आता महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महादेव जानकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली. महादेव जानकर हे परभणीमधून अधिकृत उमेदवार असणार आहेत.

महादेव जानकर(Mahadev Jankar)  यांनी उमेदवारीवर अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर काल परभणीच्या विकासावरून विरोधी पक्षांवर निशाणा साधला. जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी उपमा परभणीसाठी दिली जाते, मात्र मराठवाड्यामध्ये परभणीचाच विकास झालेला नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. नांदेड, छत्रपती संभाजी नगर, लातूर या जिल्ह्यांचा झपाट्याने विकास झाला पण परभणीचा विकास रखडला. त्यामुळे परभणीच्या विकासासाठीच या निवडणुकीत उतरलो आहे, असंही जानकर म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका