‘जाड मुलीला कोण काम देतं, दिग्दर्शकासोबत शारीरिक संबंध…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

बॉलीवूडमध्ये बऱ्याचशा अभिनेत्री बॉडीशेमिंगच्या शिकार झाल्या आहेत. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट अभिनीत रॉकी और राणी की प्रेम कहाणी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या हिंदी सिनेमातून अंजली आनंद (Anjali Anand) हिने मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण केले. मात्र तिच्या वजनामुळे तिला ट्रोलही करण्यात आले. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अंजली हिने मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे.

अंजली म्हणाली, ‘पूर्वी जाड लोकांना सिनेमा किंवा मालिकेत फक्त खाण्याची भूमिका द्यायचे. एक जाड मुलगी फ्रेंच फ्राईज किंवा बर्गर खाताना दिसत असते. तिच्या तोंडातून पदार्थ पडत असल्याचं देखील मोठ्या पडद्यावर अनेकदा दाखवण्यात आलं.’ पुढे अंजली म्हणाली, ‘बदलत्या काळानुसार आता लोकांनीही आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. आता जाड माणसाला सर्व वेळ फक्त खाताना दाखवू नये.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

करण जोहर याच्या सिनेमात भूमिका साकराण्याआधी अंजली हिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. एका मालिकेत तिला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तेव्हा जाड असताना हिला मुख्य भूमिका कशी मिळाली अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागली होती.

यावर अभिनेत्री म्हणाली, ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून मला अनेकांनी ट्रोल केलं आणि म्हणाले ‘जाड मुलीला कोण काम देतं, दिग्दर्शकासोबत शारीरिक संबंध ठेवले असतील.. मला कळत नाही लोक इतका वाईट विचार कसा करु शकतात? ‘ ‘फक्त लठ्ठ आहे म्हणून मुलगी पुढे जाऊ शकत नाही का? लोकांची अशी मानसिकता बदलण्याची गरज आहे.’ असं देखील अंजली म्हणाली.