सामना सुरू असताना रोहित शर्माला काय झालं, मैदानातून थेट रुग्णालयात केलं दाखल

ढाका: बांगलादेशविरुद्धचा दुसरा वनडे सामना सुरू असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला क्षेत्ररक्षण करत असताना दुखापत झाली आहे. ज्यामुळे त्याला मैदानातून थेट रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. बीसीसीआयने सोशल मीडियाद्वारे याबद्दल माहिती दिली आहे.

सामन्यातील दुसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बांगलादेशचा फलंदाज अनामुलचा झेल टिपण्याच्या प्रयत्नात रोहित जखमी झाला. चेंडू त्याच्या हाताच्या अंगठ्याला जोराने येऊन लागला, ज्यामुळे त्याच्या अंगठ्यातून रक्त वाहू लागले. त्यामुळे रोहितने त्वरित मैदान सोडले. भारतीय संघाच्या मेडिकल टीमने त्याच्या दुखापतीची तपासणी केली. परंतु दुखापत गंभीर असण्याची शक्यता दिसल्याने त्याला त्वरित स्कॅनसाठी जवळच्या रुग्णालायत नेण्यात आले आहे.

आता रोहित दुसऱ्या डावात फलंदाजीला येईल की नाही?, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागून आहेत.