“..तर मी कर्नाटकात जाणार”, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादार अभिजित बिचकुलेचे लक्षवेधी विधान

सातारा: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सध्या ऐरणीवर आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला डिवचत असल्याने महाराष्ट्रातील राजकीय पक्षही आक्रमक झाले आहेत. अशातच या सगळ्या वादावर बिग बॉस फेम अभिजित बिचकुले यांनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. हा वाद लवकर थांबला नाही, तर आपण आंदोलनासाठी कर्नाटकात जाऊ, असे अभिजित बिचकुले म्हणाले आहेत.

“कर्नाटक सीमावाद जर लवकर थांबवला नाही तर छत्रपती संभाजीराजे कर्नाटकात जाणार आहेत. मी देखील छत्रपती संभाजीराजेंसोबत कर्नाटकात जाणार आहे. तिथं जाऊन आंदोलन करणार आहे.” असे अभिजित बिचकुलेने म्हटलंय.

महाराष्ट्रात आणि देशात घाणेरड्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे, असं म्हणत अभिजीत बिचुकले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात केंद्रात एकाच पक्षाच सरकार आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागावा, असंही बिचुकले म्हणालेत.