वसंत मोरे नॉट रिचेबल, मनसेच्या आजच्या भोंगा आंदोलनात सहभाग नाही

पुणे  – जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे(Hanuman Chalisa)  पठण करावे, असे आवाहन करीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे(MNS chief Raj Thackeray)  यांनी भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे, असं म्हटलं आहे. देशभरात प्रत्येक राज्यात आपापल्या सत्ताधाऱ्यांना हिंदुची ताकद(The strength of Hindus)  दाखवून द्या, असा आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरे यांनी बुधवारपासून भोंग्यांविरोधात आंदोलन सुरू करण्याचे आवाहन करणारे पत्र प्रसारित केले असून याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमधील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे(vasant more) मात्र कुठेच सक्रिय दिसत नाही. उलट कालपासून ते नॉटरिचेबल झाले आहेत. त्यामुळे वसंत मोरे नेमके कुठे गेले असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसाबाबत गुढीपाडव्याच्या सभेत भूमिका जाहीर केल्यानंतर वसंत मोरे काहीसे नाराज झाले होते. त्यामुळे आज त्यांच्या गायब होण्यामुळे ते अजूनही नाराज असल्याचं सांगितले जात आहे.

दरम्यान, मोरे नाराज असले तरीही पुण्यात मनसेने काही ठिकाणी महाआरतीचे आयोजन केले आहे. पुण्यात राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मशिदींमध्ये अजान स्पीकर्सशिवाय दिली गेली. ज्या ठिकाणी नियमांचे पालन केले गेले त्या ठिकाणी मनसैनिकांनी सुद्धा हनुमान चालीसा पठन केले नाही. त्यामुळे शहरात सध्या तरी शांतता आहे.