Andheri Bypolls Election: ठाकरे गटाचं वर्चस्व सिद्ध, ऋतुजा लटके यांचा मोठा विजय

मुंबई: महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मुंबईत होणाऱ्या पहिल्याच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक २०२२ चा (Andheri Bypolls Election) आज निकाल जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी बहुमतांनी विजयश्री प्राप्त केली आहे. ऋतुजा लटके या ६६२४७ इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत. तर नोटाला १२७७६ इतकी मत मिळाली आहेत. ऋतुजा लटके पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातही जास्त मतांनी विजयी ठरल्या आहेत.

राज्यातील सत्तांतरानंतर मुंबईत होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे गटाला आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी ऋतुजा लटके याचा विजय आवश्यक होता. आज सकाळी ८ वाजता टपाली मतमोजणीस सुरवात झाली होती. यामध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात होता.

परंतु, मतदानाच्या काही दिवस आधी भाजपकडून पडद्यामागून ‘नोटा’चा प्रचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मतं पडावीत, यासाठी पद्धतशीर आखणी केली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते. परंतु ऋतुजा लटके यांच्यानंतर ची दुसरी जास्त मते नोटाला मिळण्याच यावेळी दिसून आलं आहे.