पत्रकारांच्या रोखठोक प्रश्नांनी रायन ब्रागांझा घायाळ; मायकल लोबोंसमोरच झाली शाब्दिक चकमक 

म्हापसा – गोव्यात सध्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत मात्र आता काही नेते पत्रकारांनी विचारलेल्या रोखठोक प्रश्नांवरून संतापून जात असल्याचे दिसत आहे. असाच एक प्रकार काल घडला म्हापसा येथे पत्रकार परिषदेत घडला.

नेमकं काय घडलं ?

वृत्तपत्रात आलेल्या वृत्तानुसार काल कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांच्यासह कॉंग्रेसनेते मायकल लोबो आणि माजी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विद्यमान आमदारांना दूरदृष्टीकोन नसल्याने म्हापशाचा विकास खुंटला, असा आरोप माजी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी केला. यावर पत्रकारांनी तुम्ही नगराध्यक्ष असताना तेच आमदार होते, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. पत्रकारांनी आरसा दाखवल्या नंतर पत्रकार व ब्रागांझा यांच्यामध्ये तू तू मैं मैं झाली.

म्हापसा येथे पत्रकार परिषदेत प्रत्येकवेळी पत्रकार सुधीर कांदोळकर यांना विचारतात ते २५ वर्षे कुठे होते. म्हापशात माहिती घर नाही, रवींद्र भवन नाही. हे नगरसेवकांचे काम आहे काय? हे नगरसेवकांचे, नगराध्यक्षांचे काम आहे. मग आमदारांचे काम काय असा सवाल  माजी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी पत्रकारांना केला असता पत्रकार व नगरसेवक रायन ब्रागांझा यांच्यामध्ये बरीच शाब्दिक चकमक झाली.

कुचेली झरची परिस्थिती काय झाली आहे, ती पहा असा प्रतिसवाल रायन ब्रागांझा यांनी केला असता याला तुम्हीच जबाबदार असल्याचे पत्रकारांनी सांगून त्यावेळी तुम्हीच नगराध्यक्ष होते. त्यांच्या बरोबर असताना काहीच नाही आणि काँग्रेसमध्ये आल्यावर आमदाराविरोधात बोंबा का मारता असा सवाल करून ब्रागांझा यांना धारेवर धरले.

त्यावेळी लोबोंनी मध्यस्थी करीत तेथून पाय काढता घेणे पसंत केले. व पत्रकारांची माफीही मागितली असे देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान, रोज मुखवटे बदलणाऱ्या आणि जनतेला गृहीत धरून फसवणूक करणाऱ्या नेत्यांना पत्रकारांचे सवाल किती झोंबतात हे देखील यानिमित्ताने समोर आले आहे.