मंत्री गावित यांनी ऐश्वर्या रायच्या डोळ्यांबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल खेद व्यक्त केला, म्हणाले… 

Vijaykumar Gavit Controversial Remarks :  महाराष्ट्राचे मंत्री विजयकुमार गावित यांनी यापूर्वी मासे खाल्ल्याने अभिनेत्री ऐश्वर्या रायसारखे ‘सुंदर डोळे’ मिळतात, असे विधान केले होते. त्यांच्या या टिप्पणीवर वाद निर्माण झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी खेद व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मंगळवारी (२९ ऑगस्ट) सांगितले की, धुळे जिल्ह्यात सभेत बोलत असताना महिलांच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याबाबत राज्य महिला आयोगाने मंत्री विजयकुमार गावित यांना खुलासा सादर करण्यास सांगितले होते. मंत्री गावित यांनी आपला खुलासा सादर करत आपण उपस्थित स्थानिक आदिवासी बांधवांना अहिराणी आणि त्यांच्या स्थानिकभाषेत संबोधन करत होतो, मात्र माझ्या वक्तव्याचा वृत्तवाहिन्यांकडून विपर्यास करण्यात आला.

NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली निवडणुकीची तयारी; शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

माझा उद्देश महिलांचा अपमान करणे नव्हता. माझ्याकडून या आधी सुध्दा कधीही महिलांचा अपमान होईल असे शब्द प्रयोग केले गेलेले नाहीत व यापुढेही केले जाणार नाहीत. मी समाजातील सर्व महिलांचा आदरच करत आलेलो आहे असे म्हटले आहे. तरी आपल्या वक्तव्यामुळे समाजातील कोणत्याही महिला वर्गास त्यांचा अपमान केला असे त्यांना वाटत असेल तर आपण त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो असे त्यांनी म्हटले आहे.