‘केंद्र सरकारचा अर्थसंकल्प दलित, शेतकरी, कामगार, आदिवासी, अल्पसंख्यांक विरोधी’

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( union minister nirmala sitharaman ) यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2022 ( union budget 2022 ) सादर केला.निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. यानंतर आता विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका केली जात आहे तर सत्ताधारी हा अर्थसंकल्प कसा चांगला आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ON Union Budge 2022 ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की हा अर्थसंकल्प लोककल्याणाचा आणि विकसनशील भारताचा अर्थसंकल्प आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये (लोकसभा आणि राज्यसभा) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर आजपासून चर्चा सुरू होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प दलित, शेतकरी, कामगार, आदिवासी, अल्पसंख्यांक विरोधी असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

ते म्हणाले, केंद्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला आहे परंतु हा अर्थसंकल्प दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक विरोधी आहे या अर्थसंकल्पात दलित,वंचित, शोषित, शेतकरी, कामगार,आदिवासी, अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी तसेच रोजगार निर्माण करण्यासाठी काहीही दिले नसल्याचे दिसत आहे त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा दलित, शेतकरी, कामगार, आदिवासी, अल्पसंख्यांक विरोधी असल्याचे दिसत आहे.