टोमॅटो मिळाला नाही म्हणून लगेच दोन-चार जण टाचा खुडून मेलेत का ?

Pune – देशभरात सध्या टोमॅटोचे दर हा चर्चेचा विषय बनला आहे. महाग झालेले टोमॅटो ग्राहकांना स्वस्तात मिळावेत यासाठी केंद्र सरकारने नाफेड द्वारे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटकातून टोमॅटो खरेदी करून सरकारच्या वतीने ग्राहकांना स्वस्त दरात विकण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

दुसऱ्या बाजूला माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी टोमॅटोच्या वाढलेल्या दरावरुन आक्रोश करणाऱ्या शहरी नागरिकांना फटकारले. टोमॅटो मिळाला नाही म्हणून लगेच दोन-चार जण टाचा खुडून मेलेत का, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला.मटाने याबाबत वृत्त दिले आहे.

२०१४ पूर्वी मी सांगितलं होतं कांदा परवडत नसेल तर टोमॅटो खावा, आता सांगतो टोमॅटो नाय तर कांदा खा. स्वस्ताईच्या काळात टोमॅटो ज्यूस करून घरात बॅरेल भरून ठेवा. टोमॅटोच्या ज्यूसने काय आंघोळ करायची असते का? शेतकऱ्याची जी वस्तू महागली की त्याच्या नावाने असा दंगा करायचा, म्हणजे शेतकऱ्याच्या शेतमालाची माती झाली पाहिजे. गेल्यावर्षी आठ आणे, पाच आण्याला टोमॅटो होता, चिखल झाला होता. तेव्हा कोणीही बोललं नाही. पण आता भाव वाढला तर सगळेजण बोलत आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.