सॅम करनवर रेकॉर्डब्रेक बोली, एका क्लिकवर पाहा आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या प्लेयर्सची यादी

IPL Auction: इंडियन प्रीमियर लीग २०२३चा मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) आज (२३ डिसेंबर) केरळच्या कोची येथे सुरू आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता या लिलावाची सुरुवात झाली.

इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन (Sam Curran) याला लिलावात विकत घेण्यासाठी जवळपास ५ संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. सॅम करन हा गोलंदाजी अष्टपैलू असून तो २ कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. त्याला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स अशा भरपूर संघांनी रस दाखवला. अखेर पंजाब किंग्जने सर्वाधिक १८.५० कोटींची बोली लावत त्याला ताफ्यात सामील केले. या रेकॉर्डब्रेक बोलीसह सॅम करन आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

आयपीएल इतिहासातील लिलावातील सर्वात महागडे खेळाडू (Most expensive players in IPL history):
सॅम करन – 18.5 कोटी
ख्रिस मॉरिस – 16.25 कोटी
युवराज सिंग – 16 कोटी
पॅट कमिन्स – 15.5 कोटी
इशान किशन – 15.25 कोटी
काइल जेमिसन – 15 कोटी
बेन स्टोक्स – 14.5 कोटी