गंगाखेड : शरद पोंक्षे यांचे 19 मे ला “सावरकर विचार दर्शन” विषयावर व्याख्यान

गंगाखेड/विनायक आंधळे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या जयंतीचे औचित्य साधून सवंगडी कट्टा सामाजिक समुह, गंगाखेड (Savangadi Katta Samajik Samuh, Gangakhed) च्या वतीने शुक्रवार, दिनांक 19 मे रोजी पुजा मंगल कार्यालय, वकील कॉलनी येथे व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते, लेखक व जेष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांचे “सावरकर विचार दर्शन” (Savarkar Vichar Darshan) या विषयावर व्याख्यान होणार आहे. आजच्या युवा पिढीस (Young Generation) स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देव, देश व धर्मासंबंधी जाज्वल्य विचारांची ओळख व्हावी. हा उदात्त हेतू ठेवून सर्वांकरीता खुली एक दिवसीय व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आली आहे. या निमीत्ताने आपल्या धीरोदात्त व्याख्यान व भारदस्त शैली करीता सुप्रसिद्ध असणारे, ख्यातनाम लेखक व जेष्ठ अभिनेते श्री शरद पोंक्षे यांचे विचार ऐकण्याची सुवर्णसंधी शहरवासीयांना उपलब्ध झाली आहे. सावरकर प्रेमी व सुजाण नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन सवंगडी कट्टा समाजिक समुह च्या वतीने करण्यात आले आहे.