संजय अनावडे, गणेश कुमावत यांना समाजभूषण पुरस्कार

शिर्डी/विनायक आंधळे – शिर्डी येथे दि. 30 ऑक्टोबर 2022, रविवार रोजी अखिल भारतीय कुमावत सेवा, महाराष्ट्र आयोजित कार्यक्रमात गंगाखेड येथील समाजसेवक संजय (लाला) अनावडे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच, मानवत नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष गणेश कुमावत यांना सुद्धा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कुमावत समाजातील अधिकारी, राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक, क्रिडा अशा अनेक क्षेत्रातील मान्यवर महाराष्ट्र नव्हे तर भारतात समाजाचे नाव उंचावत आहेत. आपल्या पदाचा व अधिकाराचा उपयोग समाज कार्यासाठी करत आहेत. अशा समाज बांधवांना समाजाकडून सन्मानित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, भारतीय कुमावत महासभेचे अध्यक्ष युधिष्ठिरजी कुमावत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी साहेबराजी कुमावत (कुमावत विकास सेवा संस्था महाराष्ट्र अध्यक्ष),सत्यनारायणजी जाजूरे(सहकोषअध्यक्ष महाराष्ट्र),प्रल्हादजी सारडीवाल(Dysp वाळूर) वेजेनाथजी माळवाळ(विदर्भ झोन अध्यक्ष),नंदुभाऊ कुमावत(परभणी जिल्हाअध्यक्ष),सुरेशजी कुमावत(मानवत तालुका अध्यक्ष) यासह समाजातील पुरुष, महिला व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.