Dilip Mohite Patil | “अमोल कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी .., ” दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर घणाघात 

Dilip Mohite Patil | सुरूवातीला नाराज असलेले अजित पवार गटातील नेते आमदार दिलीप मोहिते पाटील आता शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवारांच्या समजुतीनंतर आता सगळेच नेते झपाटून कामाला लागले आहेत. अशातच आढळरावांचा प्रचार करत असतांना दिलीप मोहिते पाटलांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

महायुतीकडून दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचं प्रचाराचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. यातच एका कार्यक्रमात दिलीप मोहिते पाटलांनी कोल्हेंवर जोरदार टिका करत खोचक टोला हाणला आहे. मागच्या वेळी डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं. त्यांना निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं निवडून आणलं. परंतु मला त्यांनी चहा सुद्धा पाजला नाही. असा टोमणा मोहिते पाटलांनी (Dilip Mohite Patil) कोल्हेंना लगावला.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, खासदाराने संसदेत प्रश्न मांडण्यापेक्षा जनतेच्या दैनंदिन अडचणी समजून घ्यायला हव्यात. लोकांनी आम्हाला आमदार खासदार केलं. तुम्ही संसदेत प्रश्न मांडले , मी विधानसभेत मांडले, लोकांनी प्रश्न मांडण्यासाठी आपापल्या निवडून दिले आहे. त्यामुळे आपण उपकार करत नाही. अशा शब्दात मोहिते पाटलांनी कोल्हेंना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Har Ghar Modi Parivar Abhiyan | दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’

Shivajirao Adhalrao Patil | ‘जुन्नरमधून शिवाजीदादांना सर्वाधिक मते पडणार’, आमदार अतुल बेनकेंनी व्यक्त केला विश्वास

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !