Shilpa Shetty | तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात; शिल्पा शेट्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास पत्र

Shilpa Shetty: बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) अयोध्या राम मंदिराच्या यशस्वी अभिषेकाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीं चे (Narendra Modi) कौतुक केले आहे आणि त्यांचे आभार मानले आहेत. तिने पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिले असून त्यात तिने भारतातील कोट्यवधी लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याचा उत्साह व्यक्त केला आहे. यासोबतच शिल्पा शेट्टीने पत्रात लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० वर्षांचा इतिहास बदलला आहे.

भारतीय जनता पार्टी (महाराष्ट्र) ने शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. शिल्पा शेट्टीने पत्रात लिहिले की, ‘आदरणीय मोदीजी, काही लोक इतिहास वाचतात. काही लोक इतिहासातून शिकतात. पण तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात.’

तुम्ही 500 वर्षांचा इतिहास बदलला
तिने पुढे लिहिले की, ‘तुम्ही रामजन्मभूमीचा ५०० वर्षांचा इतिहास बदलला आहे. तुम्हाला हृदयापासून धन्यवाद. या शुभ कर्माने तुमचे नावही भगवान श्रीरामाच्या नावाशी कायमचे जोडले गेले आहे. नमो राम! जय श्री राम!’

22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक झाला
गेल्या महिन्यात, 22 जानेवारी रोजी, अयोध्या (Ayodhya) राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचा एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सर्व स्तरातील दिग्गजांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर या धार्मिक सोहळ्यात बॉलिवूडपासून ते टीव्ही जगतातील अनेक स्टार्सही सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!