’11 कोटीची संपत्ती जप्त झाली म्हणून ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढणारे येड xx पहिल्यांदा बघितले’

मुंबई – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत (sanjay raut) दिल्लीत होते. याचदरम्यान संजय राऊतांच्या मालमत्तांवर ईडीनं टाच आणली. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकारणात खळबळ उडाली असून यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. खुद्द शरद पवारांनी (Sharad pawar) देखील बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर आता संजय राऊतांचे जोरदार स्वागत मुंबई विमानतळावर करण्यात आले.

विमानतळावर शिवसेनेचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवसैनिकांनी यावेळी ढोल ताशा वाजवत राऊतांचं स्वागत केलंय. खरतर संजय राऊत याचं हे अशा पद्धतीने का स्वागत केले गेले हा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता मात्र यामागे शिवसेनेला केवळ शक्तिप्रदर्शन करायचं होतं असं दिसतंय.

दरम्यान, याच मुद्द्यावर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले,11 कोटीची संपत्ती जप्त झाली म्हणून ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढणारे येड xx पहिल्यांदा बघितले असा टोला देशपांडे यांनी लगावला आहे.

दरम्यान, आज गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) सध्या आयकर विभागाच्या (Income Tax) रडारवर आहेत. आता आयकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्याशी संबंधित मालमत्तांवर टाच आणली असून  शिवसेना (Shiv Sena) नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे. यावर देखील देशपांडे यांनी निशाणा साधला आहे. चला फेटे बांधून तयार रहा,ढोल ताश्याची तयारी करा, आज पुन्हा मिरवणूक काढायची आहे फक्त आजचा मार्ग बदलला आहे.आजची मिरवणूक महापालिका ते भायखळा आहे असं देशपांडे यांनी म्हटले आहे.