तुमचे राजकारणातले वय काय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची तरी समज आली आहे का ?

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना सुजात आंबेडकर यांनी खुलं आव्हान दिलं आहे. मशिदीवरील भोंग्यांवर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar on Amit Thackeray) यांनी खरपूस समाचार घेतलाय.

राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात मशिदींवरील भोंग्यावर निशाणा साधत वक्तव्य केलं होतं.राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे, पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणून दाखवावी, मला एकही बहुजन पोरगा तिकडे नकोय असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलं आहे. त्यांच्या या आव्हानाला आता मनसेने उत्तर दिलं आहे.

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्वीट करत सुजात आंबेडकरांचा टीकेला उत्तर दिलं आहे. “मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे. “सुजात यांना कोणी मध्ये बोलायला सांगितलं आहे , तुमचे राजकारणातले वय काय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची तरी समज आली आहे का….?,” अशी विचारणा शालिनी ठाकरे यांनी केली आहे.