शोएब मलिक तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला; सानिया मिर्झाने पहिल्यांदाच तोंड उघडले!

Sania Mirza Reaction On Shoaib Malik Third Wedding:- भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झापासून (Sania Mirza) विभक्त झाल्याच्या अफवांदरम्यान पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी (Sana Javed) लग्न केले आहे. शोएब मलिकने शनिवारी, 20 जानेवारी रोजी सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. शोएब मलिकचे हे तिसरे लग्न आहे. शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नावर सानियाच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निवेदनात सानियाची टीम आणि तिच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “सानियाने तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच लोकांच्या नजरेपासून दूर ठेवले आहे. तथापि, आज शोएब आणि तिचा घटस्फोट होऊन काही महिने झाले आहेत, हे तिला सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. शोएबला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! सानियाच्या या संवेदनशील काळात आम्ही सर्व चाहत्यांना आणि हितचिंतकांना विनंती करू इच्छितो की, त्यांनी कोणत्याही प्रकारची अंदाज व्यक्त करण्यापासून दूर राहावे आणि तिच्या गोपनीयतेच्या गरजेचा आदर करावा.

शिवाजी मानकर

शोएब आणि सानियाने 2010 मध्ये लग्न केले होते

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी 2010 मध्ये लग्न केले होते. या दोघांचा विवाह पारंपारिक मुस्लिम पद्धतीने झाला होता. दोघांना एक लहान मूलही आहे, त्याचे नाव इझान आहे. इझानचा जन्म 2018 मध्ये झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय; नक्षलवाद्यांची कोल्हेकुई झाली सुरु

Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवला जाणार?

Women’s Health: 50 व्या वर्षी निरोगी राहू इच्छिता? रोज ही एक गोष्ट खायला सुरुवात करा