मिझोराममध्ये भाजप कुठे औषधालाही दिसत नाही; तेलंगणांमध्ये चौथ्या क्रमांकावर – राऊत

Assembly Election Results 2023 Live: 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी मानल्या जाणाऱ्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांच्या निकालांचा आजचा दिवस आहे. या 4 राज्यांपैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने मोठ्या विजयाकडे वाटचाल केली आहे, तर तेलंगणामध्ये काँग्रेसने चमत्कारिक कामगिरी केली आहे. सर्वात आश्चर्यकारक निकाल छत्तीसगडमध्ये आला आहे, जिथे भाजप केवळ पुढे दिसत नाही तर आरामात बहुमताकडे वाटचाल करत आहे.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी या निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पाचही राज्यात भाजपने दावा केला असेल तर तो एक विनोद म्हणून आपण घ्यायला पाहिजे. मिझोराममध्ये भारतीय जनता पक्ष कुठे औषधालाही दिसत नाही आहे मिझोरममध्ये भाजप नाही आहे छत्तीसगडमध्ये देखील भाजप नाही आणि तेलंगणामध्ये देखील भाजप नाही. मध्यप्रदेशमध्ये आता भाजपमध्ये ट्रेण्ड मध्ये चालत आहे.

तेलंगणांमध्ये भारतीय जनता पक्ष आता चौथ्या क्रमांकावर आहे.तेलंगणामध्ये काँग्रेस पुढे आहे, त्यांना दहा जागाही भेटण्याची शक्यता नाही आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सरकार येणार आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये यावेळी संघर्ष आहे जोरदार लढाई आहे. काँग्रेस आणि भाजपला दोन राज्यांमध्ये यश मिळालं तर त्याचा श्रेय मोदी किंवा शहा यांना नसणार आहे. याचे श्रेय मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चव्हाण मामाजी आणि राजस्थानमध्ये महाराणी वसुंधरा राजे शिंदे यांचे आहे. या दोघांमुळे तिकडे यश मिळाले आहे.अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

केसीआरच्या खुर्चीला धक्का बसणार? तेलंगणात काँग्रेसने प्राथमिक कलांमध्ये बहुमताचा 60 जागांचा आकडा गाठला

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

You May Also Like