Assembly Election Results 2023 Live: पनौती कोण आणि चुनौती कोण हे आज काँग्रेसला कळेल! 

Assembly Election Results 2023 Live:  देशातील गरिब, श्रमिक, शेतकरी, कष्टकऱ्यांची सेवक म्हणून सेवा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला आजच्या निकालानंतर कळले असेल की, पनौती कोण आणि चुनौती कोण? अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात भाजपाचा झालेला दणदणीत विजय आणि तेलंगणा मध्ये झालेली वाढ याबाबत आज मुंबईत भाजपातर्फे प्रदेश कार्यालयाजवळ मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार. अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रविण दरेकर, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ,

माजी मंत्री राम शिंदे, राज पुरोहित, अतुल शाह यांच्या सह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ढोल ताशांचा गजर करीत, नरेंद्र मोदी यांच्या जयजयकार करणाऱ्या घोषणा देत, मिठाई वाटून जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी. आमदार. अँड आशिष शेलार म्हणाले की, चार राज्याच्या निकालामध्ये जनतेने व्देषाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीला झिडकारून जनसेवा करणाऱ्या भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व, अमितभाई शाह यांची रणनीती आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेली व्युहरचना तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत याचे हे यश आहे. आम्ही हा विजय नम्रपणे स्विकारला आहे. या निवडणुकीत मेहनत घेणाऱ्या कार्यकर्ते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

महाराष्ट्राच्या गल्लीत उभं राहून रोज एक नेता सांगत असतो,  होय मी मर्द आहे..! त्यांचे बिनकामाचे सरदार पत्रकार पोपटलाल म्हणतात,  शाला पुरुष हवाय! अरे तुम्हाला मिडियाचे चार कॅमेरे सोडलं तर या देशात विचारतयं कोण? आज कळलं का? मर्द कोण आणि मर्दानकी काय असते ती, असा सणसणीत टोलाही यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-

केसीआरच्या खुर्चीला धक्का बसणार? तेलंगणात काँग्रेसने प्राथमिक कलांमध्ये बहुमताचा 60 जागांचा आकडा गाठला

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”