वाचाळवीर संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या; इंडियन बार असोसिएशनकडून अवमान याचिका दाखल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत यांच्याकडून देशातील न्यायव्यवस्थेवर टीका केली जात आहे. न्यायव्यवस्थेवर त्यांनी केलेली टीका त्यांना भोवणार आहे, कारण आता भारतीय बार असोसिएशनने (indian bar association)राऊतांच्या विरोधात अवमान याचिक दाखल केली आहे. न्यायालयाने सुमोटो अवमान याचिका दाखल करुन राऊतांवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे याचिकाकर्त्यानी या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील प्रतिवादी केले आहे. न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत, विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच अटकेपासून संरक्षण मिळतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही? असा सवाल  संजय राऊत (sanjay raut) यांनी उपस्थित केला होता. इथे एका विशिष्ट पक्षाला अटकेपासून संरक्षण मिळते. मग आमची शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आमच्या पक्षाच्या लोकांना संरक्षण का मिळत नाही? त्यांचे जामीन का मंजूर होत नाहीत? त्यांना अटकेपासून संरक्षण हे न्यायालय का देत नाही?असं देखील ते म्हणाले होते.

न्यायव्यवस्थेवर टीका करणे योग्य नाही. संजय राऊत हे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायव्यवस्थेबाबत बोलताना सांभाळून बोलावं, असं याचिकेत म्हटलं आहे. तसेच सामनाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे (rashmi Thackeray), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)  आणि दिलीप वळसे पाटील (dilip valase patil) यांनाही नोटीस बजावून स्पष्टीकरण मागावे, अशी मागणी बार असोसिएशनने केली आहे.