सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आरोपी सौरव महाकालच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पुणे – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Punjabi singer Sidhu Musewala) यांच्या हत्या प्रकरणामुळे अवघ्या देशभरात एकच खळबळ उडाली आहे. यातच आता या प्रकरणातील दोन आरोपी (Accused) पुण्याचे असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. आरोपी संतोष जाधव, सौरव महाकाल (Accused Santosh Jadhav, Sourav Mahakal) या दोघांचं पुणे कनेक्शन असल्याचं समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

दरम्यान, आता या प्रकरणातील आरोपी सौरभ महाकाल याला पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) नारायणगाव मधून अटक केली आहे. जेव्हापासून सौरभचे नाव या प्रकरणात आले होते तेव्हा पासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले .