राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा उद्या भाजपमध्ये प्रवेश; सुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढणार 

पुरंदर :  राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे अत्यंत निकटचे सहकारी अशोक टेकवडे (Ashok Tekwade) हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार (Ashok Tekwade Joins BJP) आहेत. टेकवडे यांनी राष्ट्रवादीला राम राम केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे पुरंदरमधील राजकीय गणितच बदलणार असल्याचं सांगितलं जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) उपस्थितीत अशोक टेकवडे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक टेकवडे गेल्या महिन्यांपासून राष्ट्रवादीत नाराज होते. अशोक टेकवडे हे सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय होते. त्यांनीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे.

टेकवडे  यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला पुरंदरमध्ये मोठं बळ मिळणार आहे. आता भाजपने मिशन बारामती सुरू केलं असून त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे अशी चर्चा आहे. या मिशनचा एक भाग म्हणूनच टेकवडे यांनाही पक्षात प्रवेश देण्यात आला आहे असं दिसतंय. त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार असल्याचे संकेत आहे.