“नव्या संसद भवनाच्या सुरक्षेत हलगर्जीपणा, तो धूर विषारी असता तर…”, खासदारांनी सांगितला घडलेला थरार

Parliament Attack: संसदेवरील हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त संसदेच्या सुरक्षेत मोठी कुचराई झाल्याचे दिसून आले आहे. प्रत्यक्षात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी सभागृहात उडी मारली आणि पिवळा गॅस फवारण्यास सुरुवात केली. यानंतर यातील एकजण लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे धावू लागला. या आरोपींनी सभागृहात उडी घेतल्यानंतर उपस्थित खासदारांनी धाडस दाखवत दोन्ही आरोपींना सभागृहातच पकडले.

“20 वर्षांचे दोन तरुण होते.”
दरम्यान, या घटनेबद्दल सांगताना काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी सांगितले की, अचानक 20 वर्षे वयाच्या दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी घेतली आणि त्यांच्या हातात टीनचे डबे होते, ज्यातून पिवळा धूर निघत होता. त्यापैकी एक जण सभापतींच्या खुर्चीकडे धावण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी घोषणाबाजी केली. कदाचित हा धूर विषारीही असला असता किंवा स्मोक बॉम्बही असू शकला असता. आजच्या दिवशीच १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला झाला होता. त्यामुळे याच दिवशी पुन्हा अशाप्रकारे घुसखोरी होणे, हे खूपच गंभीर आहे.”

पुढील आदेशापर्यंत प्रेक्षक गॅलरी बंद
या घटनेनंतर व्ह्यूइंग गॅलरी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. वास्तविक, दोन्ही तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतच ही घटना घडवली. आरोपीने संसदेत फ्लोरोसेंट गॅसही फवारला होता. विशेष म्हणजे संसदेत घुसणारे लोक दोन वेगवेगळ्या गटात आले होते. एक गट संसदेच्या आत गेला तर दुसरा गट संसद भवनाबाहेर राहिला. दिल्ली पोलिसांनी बाहेर उपस्थित आरोपीला पकडले आहे, तर आत घुसलेल्या व्यक्तीला संसद भवनातच पकडले आहे. संसदेच्या आत पकडलेल्या दोघांपैकी एक सागर शर्मा आणि दुसरा मनोरंजन डी आहे. हे दोघेही कर्नाटकातील आहेत.

महत्वाच्या बातम्या-