सरकारने प्रत्येक मोर्चाला तोंड दिले पाहिजे, कोणी ना कोणीतरी मंत्र्यांनी सामोरे जायला हवे – पाटील

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्तवातील युवा संघर्ष यात्रेची (Yuva Sangharsh Yatra) समारोपाची सभा संपल्यानंतर विधानसभेकडे कूच करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. विधानसभेवर धडकणाऱ्या या यात्रेला पोलिसांनी अडवले यानंतर मोठा संघर्ष झाला.

पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनीही पोलिसांचे बॅरिकेटस् तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या संघर्षात आमदार रोहित पवार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी युवा संघर्ष यात्रेवर झालेल्या लाठीचार्जबद्दल पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ८०० किलोमीटरची पदयात्रा करून काही युवक महाराष्ट्रातून इथे येतात तेव्हा त्यांची साधी अपेक्षा असते की, काही मागण्या घेऊन ते आलेले आहेत. विधानसभेत सरकारच्या प्रतिनिधींनी जाऊन त्यांचे गाऱ्हाणे ऐकावे पण, मंत्रिमंडळातील कोणीही तिथे आले नाही; त्यामुळे सगळेच युवक इथे यायला निघालेत आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, खरंतर सरकारचा निषेध केला पाहिजे कारण, सरकारने प्रत्येक मोर्चाला तोंड दिले पाहिजे कोणी ना कोणीतरी मंत्र्यांनी सामोरे जायला हवे आणि त्यांचे गाऱ्हाणे ऐकायला हवे.

दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी, तिसऱ्या पक्षाला जाऊन आश्वासन देणे हे कशात बसते ? सरकारनेच त्यांच्या प्रश्नांना तोंड द्यायला हवे, मुख्यमंत्र्यांनी ही काळजी घ्यायला हवी होती की, इथे येणाऱ्या सगळ्या मोर्चांना कुणी ना कोणीतरी सामोरे जायला हवे होते. असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

हे ट्रिपल इंजिन सरकार नसून ट्रबल इंजिन सरकार; जयंत पाटील विधानसभेत गरजले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा;अशोक चव्हाण यांची मागणी

Barbeque Chicken Salad तुमच्या तोंडाला आणेल पाणी! रेसिपी नोट करुन घ्या