Parliament Security Breach: संसदेतील गोंधळाचं महाराष्ट्र कनेक्शन, लोकसभेत घुसखोरी करणारा लातूरचा तरुण कोण?

Parliament Attack: संसदेवरील हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त संसदेच्या सुरक्षेत मोठी कुचराई झाल्याचे दिसून आले आहे. प्रत्यक्षात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी सभागृहात उडी मारली आणि पिवळा गॅस फवारण्यास सुरुवात केली. यानंतर यातील एकजण लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे धावू लागला. या आरोपींनी सभागृहात उडी घेतल्यानंतर उपस्थित खासदारांनी धाडस दाखवत दोन्ही आरोपींना सभागृहातच (Loksabha Security Breach) पकडले.

या घटनेबाबत अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, या घटनेचा तपास सुरू आहे. दोन्ही आरोपींना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून सर्व प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचवेळी संसदेबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या एक महिला आणि पुरुषालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, नंतर या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कोण आहेत ते चौघे?
संसदेबाहेर झालेल्या या घटनेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. नीलम आणि अमोल शिंदे अशी त्यांची नावे आहेत. नीलम कौर सिंह ही महिला असून तिचे वय ४२ वर्षे आहे, ती हरियाणातील हिसार येथील रहिवासी आहे. अमोल शिंदे असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. अनमोलच्या वडिलांचे नाव धनराज शिंदे असून ते महाराष्ट्रातील लातूरचे रहिवासी आहेत. त्याचे वय २५ वर्षे आहे. संसद भवनाबाहेर आणि परिवहन भवनासमोर ही घटना घडली. या दोघांनाही पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. दिल्ली पोलिसांसह इंटेलिजन्स ब्युरोची टीमही चौकशी करत आहे.

संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या दोघांनी भारत माता की जय, जय भीम, हुकूमशाही चालणार नाही, अशा घोषणा दिल्या. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

लोकसभेतही दोन तरुणांनी गोंधळ घातला
लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून उडी मारलेल्या तरुणाचे नाव सागर शर्मा असल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार दानिश अली यांनी सांगितले की, ज्या तरुणांनी सभागृहात उडी मारली ते एका खासदाराच्या नावाने लोकसभा अभ्यागत पासवर आले होते. सभागृहात गोंधळ घालण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

सागर शर्मा यांच्याशिवाय लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे मनोरंजन डी आहे. जो कर्नाटकातील म्हैसूरचा रहिवासी आहे. त्याचे वय ३५ वर्षे आहे. बेंगळुरूच्या विवेकानंद विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकी पूर्ण केली आहे. खासदार प्रताप सिम्हा यांच्या पासवर या दोन तरुणांनी संसदेत प्रवेश मिळवला होता.

मात्र, संसदेच्या आत आणि बाहेर गदारोळ करणाऱ्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा आणि गृहसचिव अजय भल्ला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संसदेत पोहोचले आहेत.

महत्वाच्या बातम्या-