काँग्रेसचा गोंधळ पाहून मुस्लिम पक्ष सोडत आहेत ?

उदयपुर – राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाचे (Rajasthan Congress Party) तीन दिवसीय चिंतन शिबिर सुरू असून रविवारी चिंतन शिविराचा शेवटचा दिवस आहे. या चिंतन शिबिरात काँग्रेस नेत्यांकडून अनेक मागण्या करण्यात आल्या आणि अनेक गोष्टींवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली चिंतन शिबिरात भाजपचे हिंदुत्व आणि मुस्लिम यावरही चर्चा झाली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel)  यांनी जोर दिला की, पक्षाने आपल्या राज्यात जसे हिंदू सण साजरे करण्यास संकोच करू नये. परंतु महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी अधिक वैचारिक स्पष्टतेसाठी दबाव आणला. पक्षाच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे मुस्लिम पक्ष सोडत असल्याचे पक्षाच्या अन्य एका सदस्याने सांगितले.

काँग्रेस नेते पी चिदंबरम (Chidambaram) यांनी पत्रकार परिषदेत 1991 च्या उपासना कायद्याचा संदर्भ घेतला आणि स्पष्ट भूमिका घेतली की कोणत्याही प्रार्थनास्थळाची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नये. मात्र भाजपच्या (BJP) हिंदुत्वाचा (Hindutva) मुकाबला कसा करायचा, या मोठ्या प्रश्नावर येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय चिंतन शिबिरातही पुढचा रस्ता स्पष्ट दिसत नव्हता.